Majestic Diwali Sanch

(Out of stock .Please contact on customer care )

'मॅजेस्टिक बुक डेपो', ठाणे यांच्यावतीने सुरू असलेल्या या दिवाळी अंक सवलत योजनेत 'दीपावली', 'मौज', 'कालनिर्णय सांस्कृतिक', 'महाराष्ट्र टाइम्स', 'अनुभव', 'अक्षर' हे सहा दिवाळी अंक याशिवाय 'मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस'ने प्रकाशित केलेल्या

 1. सहावं महाभूत आणि मी! :
  शोभा बोंद्रे / सतीश जोशी
 2. तीन यांची शर्यत
  डॉ. बाळ फोंडके
 3. तथाकथित
  विजय तांबे
 4. भटकेगिरी
  द्वारकानाथ संझगिरी

या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक नोंदणी करतानाच मिळवा. शिवाय प्रतिवर्षाप्रमाणे 'मॅजेस्टिक कालनियोजक' ही ७० रुपये किमतीची डायरी (यंदाच्या डायरीचा विषय आहे - महती क्रिएटिव्ह थिंकींगची! लेखक : सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते डॉ. सुहास भास्कर जोशी) मिळून एकूण १२२५ रुपयांचा हा संच वाचकांना फक्त 1000 रुपयांत उपलबद्ध करून देण्यात येईल.

Rate : 1000

Weight : 3.5 kg

Shipping By Post on 16th Oct and will be delivered after 4 to 5 days

या चार पुस्तकांपैकी आपणांस आवडलेले कोणतेही एक पुस्तक निवडा

The best seller books in 2017

सहावं महाभूत आणि मी!

Author - शोभा बोंद्रे / सतीश जोशी
Mrp - 220
pages - 173
Publisher - Majestic Publishing House

'सहावं महाभूत आणि मी' ही गोष्ट आहे; आजच्या काळातल्या सहाव्या महाभूताची - कॉम्प्यूटरची - तशीच कॉम्प्यूटरने वेढून टाकलेल्या माणसांच्या जमातीची आणि ह्या प्रवासाचा साथीदार असलेल्या सतीश जोशींची.
'भारत म्हणजे आय. टी. तज्ज्ञांचा देश' ही नवी व्याख्या जगाने मान्य केली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधला हा महत्त्वाचा 'भारतीय टप्पा' म्हणजे जागतिक पातळीवरच्या बिझनेसमधील एक महत्त्वाची उलथापालथ. ही ह्या उलथापालथीचीही गोष्ट आहे.

तीन यांची शर्यत

Author - डॉ. बाळ फोंडके
Mrp - 200
pages - 177
Publisher - Majestic Publishing House

'सरोगेट मदर' हा अपत्यहीन स्त्रीला मातृत्वाकडे नेणारा दरवाजा आधुनिक तंत्रज्ञानाने उघडला. मात्र या तंत्रज्ञानाच्या वापरापोटी उद्भवणा-या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक आणि कायद्याच्या समस्यांनीही डोकं वर काढलं.
या समस्यांनी स्त्रियांच्याच नव्हे तर त्यांच्या पुरुष जोडीदाराच्या किंबहुना सर्व कुटुंबाचाच भावजीवनात अभूतपूर्व वादळं उठू लागली. या वादळांच्याच विज्ञानकथांचा हा संग्रह.

तथाकथित

Author - विजय तांबे
Mrp - 220
pages - 182
Publisher - Majestic Publishing House

'तथाकथित' या संग्रहातील विजय तांबे यांच्या कथांमध्ये सामाजिक भानाच्या तुलनेत कल्पकता अधिक जाणवते. प्रयोगशील लेखकांच्या कथा वाचकांपर्यंत पोहोचणे हे साहित्यसंस्कृतीच्या सकस जोपासनेसाठी अत्यंत आवश्यक असते. वास्तववादाच्या आहारी गेलेल्या मराठी साहित्यासाठी ह्या कथा अभ्यासाचा असा वस्तुपाठ ठरू शकतात. -सतीश तांबे

भटकेगिरी

Author - द्वारकानाथ संझगिरी
Mrp - 220
pages - 220
Publisher - Majestic Publishing House

विविध देश, त्यांची संस्कृती, उत्कृष्ट शिल्प, निसर्गामधील श्वास रोखून धरावा अशी सौंदर्याची विविध रूपे; माणसाने विज्ञानाला गुलाम करून उभारलेल्या भव्य वास्तू, विविध कलांचा आविष्कार... आपल्या जगभरच्या भटकेगिरीत पाहिलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींविषयीचे विलोभनीय लेखन.

मॅजेस्टिक कालनियोजक!

Author - डॉ. सुहास भास्कर जोशी
Mrp - 70
Publisher - Majestic Publishing House

मॅजेस्टिक कालनियोजक' ही ७० रुपये किमतीची डायरी (यंदाच्या डायरीचा विषय आहे - महती क्रिएटिव्ह थिंकींगची! लेखक : सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते डॉ. सुहास भास्कर जोशी)